बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

पर्यटनावर बोलू काही….

अमित जाधव-संपादक

पर्यटनावर बोलू काही….

संपूर्ण देशात असा एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही ज्याला फिरणे आवडत नसावे. वेळ, काळ, प्रसंगानुरूप सगळे लोक त्यांच्या सोयीप्रमाणे फिरत असतात. कोणी शनिवार-रविवार फिरण्याचे नियोजन करतं तर कोणी मधल्या दिवसांमध्ये जास्त लोकांची वरदळ नसते असा समज ठेऊन  फिरण्याचे नियोजन करत . थोडक्यात काय वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तेथील खाद्य, वेशभूषा, केशभूषा संस्कृती, जगण्याची पद्धत आपल्याला फिरल्यामुळेच  कळते. दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात काही काळ विश्रांती मिळावी किंवा  रुटीन मध्ये थोडासा चेंज यावा यासाठी देखील लोक फिरायला जातात.  याच फिरण्याला लक्षात घेऊन आजचा दिवस हा जागतिक पर्यटन दिवस ( २७ सप्टेंबर) म्हणून ओळखला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. आजच्या दिवशी जगभरातील सर्व देश जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, योजना, सुविधा जाहीर करतात त्याचबरोबर विविध स्पर्धा मग त्यात फोटोग्राफी, निबंध, प्रवास वर्णन लेखन , पोस्टर मेकिंग स्पर्धा अश्या स्पर्धाचा देखील समावेश केला जातो.

जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जाऊ लागल्यामुळे पर्यटन क्षेत्रात देखील करिअरच्या अनेक  संधी उपलब्ध झाल्या आहेत. ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे अशांना पर्यटन क्षेत्रात कारकीर्द करणे आता सहज शक्य झाले आहे. पर्यटन क्षेत्रात येण्यासाठी विविध महाविद्यालयातून  ट्रॅव्हल अँड टुरिजम सारखे कोर्सेस देखील विद्यार्थ्यांना दिले जातात. पर्यटन क्षेत्रात येण्यासाठी आपल्यालकडे संवाद कौशल्य उत्तम असणे आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे त्याचबरोबर भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी व याचबरोबर संबंधित देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी. गाईड ,टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजन्सी, माहिती साहाय्यक इ . करिअर संधी   आपल्याला पर्यटन क्षेत्रात प्रवेश केल्यावर मिळू शकतात.

सदाफ फातिमा शेख
सलाम बॉम्बे फाऊंडेशन, मीडिया अकादमी
इ. ९ वी छत्रपती शिवाजी विद्यालय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे