ब्रेकिंग, मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई ; 5 कोटी 63 लाखांचा गांजा जप्त…..
ब्रेकिंग, मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई ; 5 कोटी 63 लाखांचा गांजा जप्त.
नादेड, ता 15 नोव्हे, – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आज नांदेड जिल्ह्यातून ₹ 5.63 कोटी किमतीचा 1127 किलो गांजा जप्त केला, जप्त केलेला गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम राज्यात आणला जात होता. मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर मंजराम येथे कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजा राज्यात आणला जाणार असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी सापळा रचला. सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांनी मांजरा येथे एका ट्रकला राज्यात प्रवेश केल्यावर संशयावरून अडवले. झडतीदरम्यान 1,127 किलोग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. एका विशिष्ट माहितीच्या आधारे कारवाई करून आमच्या पथकाने सापळा रचला आणि वाहन येताच अडवले, ट्रकच्या आत गोण्यांमध्ये गांजा साठवून ठेवला होता आणि तो राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुरवला जाणार होता,” असे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.
सदर कारवाईत एनसीबीने १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी एनसीबीने ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्हा नोंद केला आहे. हा माल कुणाला पोहचवला जाणार होता याचा तपास सुरू आहे.