महाराष्ट्राचे गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू तसेच आनंद प्रल्हाद शिंदे यांचा पुतण्या ‘सार्थक दिनकर शिंदे’ यांचे आज दुःखद निधन झाले आहे. सार्थक दिनकर शिंदे हे नांदेड येथे होते ,हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने यातच त्यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. सार्थक शिंदे यांच्या अचानक जाण्याने संगीत सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सार्थक शिंदे हे उत्कृष्ट तबला वादक होते. आज महाराष्ट्राने एका उत्कृष्ट तबलावादकला गमावले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सार्थक शिंदे यांनी अनेक भीमगीतं गायली होती, त्यांना ढोलकी वाजवण्याचीही आवड होती.प्रल्हाद शिंदे यांच्या गायनाचा वारसा त्यांच्या आनंद, दिनकर आणि मिलिंद या तिन्ही मुलांनी पुढे चालवला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सार्थक शिंदे यांनीही या कलेची जोपासना केली. घरात संगीताचे वातावरण असल्याने हेच क्षेत्र निवडण्याचे त्यांनी ठरवले. शिंदे घराणं आपल्या भीम गीतासाठी आणि आंबेडकर गीतासाठी प्रसिद्ध आहे. या घराण्याने आजवर अनेक गाणी महाराष्ट्राला दिली आहेत. आपले आजोबा, काका यांच्याकडून सार्थकने प्रेरणा घेतली. उत्कृष्ट गायनासोबतच त्यांना तबला आणि ढोलकी वादनाची विशेष आवड होती. शिंदे घराणं गेल्या चार पिढ्यांपासून या क्षेत्रात नाव लौकिक करत असलं तरी सार्थक शिंदे यांनाही या क्षेत्रात येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. सार्थक शिंदे यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुःखद प्रसंगातून शिंदे कुटुंबियांना सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना सर्वच स्तरातून केली जात आहे. सार्थक शिंदे यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
Related Articles

काँग्रेसच्या अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेडच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रतिष्ठित वकील आत्माराम दवणे यांची नियुक्ती…
20 hours ago

मुंब्रा रेल्वे स्टेशन ब्रिज येथे झालेल्या खुणाची उकलं, मुंब्रा पोलिसांनी केल दोन तासाच्या आत आरोपीला केल अटक..
20 hours ago
Check Also
Close