डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे मित्र मंडल आयोजित साबे येथील रास दांडियात बालकांनी केली सुंदर वेशभुषा….
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता 23 ऑक्टो : दिवा शहरातील डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे मित्र मंडळ आयोजित श्री. मनोहर हरीचंद्र पाटील नगर, साबेगाव येथे शारदीय नवरात्रौत्सव व भव्य रास दांडियात वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडल्या असून प्रथम पारितोषिक मा. नगरसेवक अशोक पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. सदर रास गरबा मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या उत्कृष्ट आयोजनाने पाटील नगर, साबेगाव येथील असंख्य नागरिक ,महीला वर्ग ,तरुण तरुनींनी मोठ्या संख्येने रास दांडिया खेळायला उपस्थिती लावत आहे. भव्य स्टेज, ऑर्केस्ट्रा आणि रोज नवनवीन गायक-गायिकांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात गरबा रसिकांना दंग करून तरुणाई बेधुंद होत गरबा नृत्य करताना दिसत आहेत. शैलेश पाटील यांच्या उत्कृष्ट आयोजनाने डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई मुख्य आकर्षण आहे.
साबे गावातील हा रास गरब्यात वेशभूषा स्पर्धा उत्सहात पार पडली. गरबा रसिकांनी अनेक पारितोषिक व भेटवस्तू जिकल्या तसेच लक्की ड्रॉ देखील ठेवण्यात आला असून विजेत्यास अँड्रॉइड मोबाईल फोन देण्यात येत आहेत लक्कि ड्रॉ, उत्कृष्ट गरबा नृत्य म्हणून ५ महीला पैठणी व ५ तरुण ना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या आहेत. प्रसंगी मंडळाचे समीर पाटील, संदीप भगत, निलेश म्हात्रे, पंकज तावडे, सुभाष गजरे
सुमित मोरे तसेच हर्षल म्हात्रे उपस्थित होते.