ब्रेकिंग
मतदार साहाय्यता क्रमांक सेव्ह करा,
- मतदार साहाय्यता क्रमांक सेव्ह करा
भारत निवडणूक आयोगाच्या 1800221950 मतदार साहाय्यता क्रमांकावर 18 एप्रिलपर्यंत 7312 इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली असून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिली आहे. मतदारांना त्यांच्या मनातील शंका व प्रश्न विचारण्यासाठी हा नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही हा नंबर सेव्ह करून ठेवू शकता.