मा.जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे पाटील यांची आज भेट घेतली.यावेळी माझ्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील तसेच ईतरही दिवा रेल्वे व रेल्वे प्रवाशांसंदर्भातील समस्या त्यांच्यासमोर विस्तृतपणे मांडल्या….
अमित जाधव-संपादक
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे पाटील यांची आज भेट घेतली.यावेळी माझ्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील तसेच ईतरही रेल्वे व रेल्वे प्रवाशांसंदर्भातील समस्या त्यांच्यासमोर विस्तृतपणे मांडल्या.
बैठकीचा सारांश :
१. रेल्वे प्रशासनाने एसी लोकलची संख्या वाढवून साध्या लोकल कमी केल्या आहेत.पण एसी लोकलच्या तिकिटांचे दर मध्यमवर्गीयांना परवडणारे नसल्याने प्रवासी एसी लोकल टाळतात.परिणामी पुढील साध्या लोकलमध्ये गर्दी वाढते,काही तरुण अक्षरशः दाराला लटकत प्रवास करून जिवाचा धोका पत्करतात.गेल्या काही महिन्यांत १७० पेक्षा जास्त तरुणांनी याप्रकारच्या दुर्घटनेत जीव गमावल्याची माहिती मंत्री महोदयांना दिली.
२. वर्दळीच्या वेळी (Peak Hours) प्रशासनाने फक्त साध्या लोकल चालवाव्यात,अशी विनंती केली.
३. पारसिक बोगद्याच्या एका बाजूला वाघोबानगर आणि दुसरीकडे भास्करनगर या दोन्ही बाजूने खाली असलेल्या रेल्वे ट्रॅकवर माती घसरत आहे,येथे लवकरात लवकर संरक्षक भिंतीची उभारणी करावी नाहीतर येथील नागरिकांना तसेच रेल्वेला मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागू शकते.
४. दिव्याला होम प्लॅटफॉर्म आहे पण सद्यस्थितीत त्याचा उपयोग काहीही होत नाही,त्यामुळे येथून वर्दळीच्या वेळी (Peak Hour) एक लोकल सुरू करावी,अशी मागणी केली.जेणेकरून या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होईल.
५. कळवा रेल्वे स्थानक येथे यार्ड आहे,येथे होम प्लॅटफॉर्म होऊ शकतो अशी नागरिकांची सुचना आहे,यावर रेल्वे प्रशासनाने विचार करावा,हे मंत्री महोदयांना सुचविण्यात आले.
६. मुंब्रा रेल्वे स्थानक येथे एस्कलेटरचे काम खुप संथगतीने सुरु आहे,या कामाची गती वाढवून एस्कलेटरची सुविधा नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध होईल,याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी देखील केली.
७. पारसिक बोगद्यातून जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन कळवा,मुंब्रा येथून जात आहेत,त्यामुळे होणाऱ्या कंपनाने काही दिवसांअगोदर एका इमारतीची भिंत कोसळली,येणाऱ्या काळात देखील अश्या दुर्घटना होवू शकतात.या दुर्घटना टाळण्यासाठी येथे साऊंड बॅरिअर लावावेत,अशी विनंती केली.
८. मुंब्रा रेल्वेस्थानकाची इमारत ऐतिहासिक असून काही ठिकाणचा भाग खचल्याचे आढळते,या इमारतीची दुरुस्ती करून हा ऐतिहासिक ठेवा जपण्यात यावा,अशी देखील मागणी केली.
वरील सर्व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्या जाईल,अशी ग्वाही मा.मंत्री महोदयांनी दिली. सर्व कळवा-मुंब्रावासीय तसेच रेल्वे प्रवाशांच्या वतीने या भेटीबद्दल त्यांचे आभार मानले.ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. Anand Paranjpe तसेच इतर सहकारी यावेळी उपस्थित होते.