दिव्यात चिकन विक्रेत्यावर पाच जणांनी केले सपासप वार,सदर चिकन विक्रेता गंभीर जखमी…
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता २७ एप्रिल :दिव्यात ऐका मच्छी/मटण विक्रेत्यावर पाच जणांचा जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नूरइस्लाम अंगूर शेख (वय 32 वर्षे) व्यवसाय-चिकन मच्छी विक्री, राहणार बेडेकर नगर, दिवा पुर्व असून त्याचे अमिन चिकन शॉप या दुकानासाठी लागणारे मासे आरोपी याचेकडून खरेदी करत नसल्याचा राग मनात धरून यातील आरोपींनी फिर्यादी नूरइस्लाम अंगूर शेख यास जीवे ठार मारण्याच्या सामाइक उद्देशाने फिर्यादीचे दोन्ही हातावर, डाव्या खांद्यावर, छातीवर आणि डाव्या पायावर कोयत्याने व चाकूने वार केले असून गंभीर जखमी केले आहे. फिर्यादी नूरइस्लाम अंगूर शेख यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे.
प्रकरणी दिवा पोलिसांनी सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी रोहित गुप्ता यास अटक करण्यात आली असून प्रकरणी सदर आरोपी आणी इतर तीन अनोळखी इसम यांच्यावर मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र – 676/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109,189(1), 189(2), 189(4), 190, 191(2), 191(3) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(3)135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्हीही आरोपीना आज कोर्टात हजर केले असता पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर करत आहेत