ब्रेकिंग
कल्याण मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य असे ज्ञान केंद्र लवकरच होणार खुले.. खासदार डॉ श्रीकांत शिंदे
अमित जाधव - संपादक

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेतील ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा आणि ज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य अशा पुतळ्याचे गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. यातील ज्ञान केंद्राचे काम आता पूर्णत्वास आले आहेत. या केंद्राची आज पाहणी केली. येत्या काही काळात हे ज्ञान केंद्र नागरिकांसाठी खुले होणार असून याची अनुभूती सर्वांना घेता येणार आहे.असे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवणारे हे केंद्र सर्वांसाठी निश्चितच प्रेरणा ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन, स्मारकांच्या भिंतींवर ३ डी चित्र, ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्राम आणि लाईट शो तसेच सांस्कृतिक समारंभासाठी स्मारक परिसरात भव्य सभागृह अशी या केंद्राची रचना आहे. विद्यार्थ्यांसमवेतच सर्वांसाठी हे स्मारक एक प्रेरणा देणारे आणि आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची महती पुढील पिढ्यांपर्यंत पोहचण्यासाठी एक महत्वाचा दुवा ठरणार आहे असे त्यांनी बोलताना स्पष्ट केल तसेच या पाहणी वेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.