दिव्याजवळील बेतवड्यात “परवडणारी घरे” योजनेकडे विकासकांच पूर्णपणे दुर्लक्ष…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता २३ : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘परवडणारी घरे’ ही योजना दिवा शहराजवळील बेतवडे गावात राबविण्यात येत असून ही योजना राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेस बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत. या भूखंडावर पी.पी.पी. या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यानुसार महापालिकेने निविदाही मागिवली होती परंतु या निवेदेला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. दोन वेळा निवेदेला मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु दोनही वेळेला प्रतिसाद न आल्याने आता अटी आणि शर्तीमध्ये बदल करण्याचा निर्णय महापालिका करत असल्याची माहिती मिळत आहे.
बेतवडे गाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘परवडणारी घरे’ या अंतर्गत आर्थिक दुर्बल – घटकातंर्गत येणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १४४१ लाभार्थी आहेत. पैकी १२५३ लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार असून उर्वरित १८८ प्रकल्पबाधितांना रुपये दोन लक्ष इतका आर्थिक हिस्सा देऊन सदनिका उपलब्ध होणार आहेत. विकासकाला या योजनेतून १२७.९० कोटी एवढे उत्पन्न मिळेल असेही पालिकेने प्रस्तावात नमुद केले आहे तर प्रकल्पाकरीता येणारा खर्च ३६.८५ कोटी महापालिकेला डेव्हल्पमेंट चार्ज म्हणून द्यावे लागणार आहे.