
चाकूने सपासप वार! 3 जणांना घेतले ताब्यात
सैफ अली खानवर त्याच्या घरातच चाकूने हल्ला झाल्याने सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. याप्रकरणी आता सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच तिघांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तगडा बंदोबस्त असतानाही चोर 12 व्या मजल्यापर्यंत पोहचला अन् सैफवर सपासप वार केले. दरम्यान, सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात शस्रक्रिया होणार आहे.