पुरोगामी पत्रकार संघ ठाणे शहर यांच्या वतीने महाराष्ट्राचे ख्यातनाम महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यातील येऊर या ठिकाणी पत्रकारांसाठी कार्यशाळाआणि कवी संमेलन संपन्न……
अमित जाधव-संपादक
पुरोगामी पत्रकार संघ ठाणे शहर यांच्या वतीने महाराष्ट्राचे ख्यातनाम महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यातील येऊर या ठिकाणी पत्रकारांसाठी कार्यशाळाआणि कवी संमेलन संपन्न
ठाणे:(सुभाष शांताराम जैन): पुरोगामी पत्रकार संघ ठाणे शहर यांच्या वतीने महाराष्ट्राचे ख्यातनाम महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यातील येऊर या निसर्गरम्य ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजय सुर्यवंशी साहेब यांच्या प्रेरणेने पत्रकारांसाठी कार्यशाळाआणि कवी संमेलन 16 सप्टेंबर रोजी संपन्न झाले.
पत्रकारांसाठी असलेले कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. सुशील जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी एडवोकेट बि.जी. बनसोडे एडवोकेट यादव, एडवोकेट पत्रकार प्रशांत गायकवाड न्यूज चैनल चे सुरेश जगताप कवी साहित्यिक राजा रावळ, पंढरीनाथ गायकवाड पत्रकार सुभाष जैन , धनंजय सरोदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी भीमराव शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावरील मान्यवरांनी तसेच उपस्थितांनी भिमराव शिरसाट यांचा सत्कार केला. त्यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्राध्यापक सुशील जाधव म्हणाले की पत्रकारांनी लढवय्या असावे.पण प्रत्यक्षात लढाई करू नये प्रसंग ठिकाणाचे गांभीर्य ओळखूनच वातावरण निर्मिती करावी.सदर प्रसंगानुरूप सर्वात वरच्या लेव्हलवर दाद मागण्याचा प्रयत्न करावा म्हणजे प्रश्नांची सोडवणूक तात्काळ होते. किंवा परिस्थितीशी संबंधित अधिकाऱ्यांना सोडवणुकीसाठी भाग पाडते. पत्रकार हा समाजमनाचा आरसा आहे तुम्ही कसे दिसता अपेक्षा तुमच्या वागण्यावर समाजाचे लक्ष असते. एडवोकेट बी.जे. बनसोडे, एडवोकेट प्रशांत गायकवाड, एडवोकेट जालिंदर जाधव यांनी पत्रकारांनी वेगवेगळ्या प्रसंगी कायद्याचा कसाआधार घ्यावा, आणि सर्व समस्यांत सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसा उपयोग करावा याविषयी मौलिक मार्गदर्शन केलं.
दुपारच्या सत्रात कवी वसंत अहिरे विठ्ठलराव सपकाळ शाहीर बाळासाहेब जोंधळे प्रवीण देवपूरकर ,दीपक कोटकर, राजा रावळ, सुभाष जैन, धनंजय सरोदे इत्यादी कवींनी आपल्या कणखर आवाजातआपल्या शैलीत दिलखुलासपणे सादर कविता सादर केल्या.
आरंभी सकाळच्या वेळी पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भीमराव शिरसाठ यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त संघाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने येऊर येथील आदिवासी पाड्यावर जाऊन मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले .या प्रसंगी पत्रकार सुभाष जैन, राजा रावळ ,बाळासाहेब जोंधळे, नारायण पायल , जेष्ठ कवी धनंजय सरोदे स्थानिक कार्यकर्ते शिवा वरखडे,संतोष चव्हाण, सुधाकर इथाड, बालाजी मसुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळच्या सत्रात ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ पगारे व कुटुंबांचा तसेच भीमराव शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कोटकर यांनी केले.असे पुरोगामी पत्रकार संघ ठाणे शहर पत्रकार आणि प्रसिद्धीप्रमुख सुभाष शांताराम जैन यांनी कळविले आहे.