बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शिवसेना दिवा शहर युवतीसेने च्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्या्थ्यांचां गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता 25 जून  दरवर्षी प्रमाणे दिवा शहरात शिवसेना युवती सेनेच्यावतीने विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात होता. दिवा शहराच्या युवतीसेना प्रमुख कु.साक्षी मढवी आणि शहर समन्वयक कु.रश्मी उमेश भगत यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आकांक्षा हाँल येथे पार पडला. दिवा शिवसेना विद्यार्थांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर सत्कार सोहळे आयोजित करीत असते.नुकत्याच पार पडलेल्या दिवा महोत्सवात ८० टक्के पेक्षा जास्त गुण संपन्न झालेल्या विद्यार्थांचा सत्कार केला होता. तर आजच्या कार्यक्रमात ७० टक्केंपेक्षा जास्त गुणसंपन्न विद्यार्थांचा सत्कार केला आहे.या वर्षी दिव्यात ७० टक्केपेक्षा जास्त गुण पडलेल्यांमध्ये 400 विद्यार्थांचा समावेश आहे.त्यामुळे विद्यार्थांसाठी मिळणारे हे यश दिवेकर नागरिकांसाठी अभिमानाचे ठरत आहे.

या कार्यक्रमात इयत्ता बारावी विशेष प्राविण्य (टाँपर्स) मिळविलेल्या दिव्यातील विद्यार्थांमध्ये यश पाटील (90%),प्रभाजन खोत (82.83%), विवेक रोहेकर (71.33%),राज कदम (68.67%),आनंद वेंगुर्लेकर (71%),राजशेखर दहीफुले (62.67%), चेतन पवार (88%) तर इयत्ता दहावीच्या परिक्षेत गणेश विद्यामंदीरच्या विद्यार्थांनी चमकदार कामगिरी केल्याचे दिसून येत आहे.यात रुपेश झोरे (91.40%),आदीत्य दमारे (94.60),आयुष मोरे (90.20%),एसएमजी विद्यामंदीरचा विद्यार्थी श्रेयश नवले (91.60%),भुषण मुंढे (90%),सुभ्रतो घोष (93.40%),विजयंती नाक्ती,वारेकर शाळा (91%) नील संडव (90%),श्वेता सावरटकर (94%) आदी दिव्यातील विशेष प्राविण्य मिळालेले विद्यार्थी आहेत.या सर्व विद्यार्थांचा शिवसेनेच्या युवती पदाधिकारी यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

प्रसंगी कार्यक्रमात दिवा शहर प्रमुख श्री रमाकांत मढवी उपस्थित होते.तसेच मा. नगरसेवक दिपक जाधव, शिवसेना विभागप्रमुख श्री भालचंद्र भगत,दिवा शिवसेना प्रवक्ते अँड.आदेश भगत, श्री चरणदास म्हात्रे,श्री विनोद मढवी,विभागप्रमुख श्री उमेश भगत,समाजसेविका सौ.अर्चना निलेश पाटील,श्री शशिकांत पाटील,श्री राजेश पाटील,श्री सचिन चौबे,श्री सदाशिव पाटील,उपविभाग प्रमुख गणेश गायकवाड, राजेश पाटील आदींसह युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विनोद पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे