दिव्यातील अधिकृत शाळेच्या बेमुदत शाळा बंद आंदोलनाला रिपब्लिकन (आठवले) दिवा विभागाचा पाठिंबा- दिनेश पाटील (विभाग अध्यक्ष RPI-A)..
अमित जाधव - संपादक

ठाणे महापालिका शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसारित केली जाते.या शाळांमध्ये पाल्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू नये असे देखील सांगितले जाते.परंतु या अनधिकृत शाळांवर ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत योग्य ती कारवाई केली जात नाही कायम दुर्लक्ष केले जाते यामुळे बेकायदा शाळांना अभय मिळत आलेला आहे असे दिनेश पाटील यांच्या कडून सांगण्यात आले. अनधिकृत शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे असे मत ही ओबीसी आघाडी अध्यक्ष RPI -A एकनाथ भगत यांच्या वतीने नोंदविण्यात आले.
अनधिकृत शाळांवर कारवाई व्हावी हि प्रमुख मागणी RPI -A ची आहे. दिव्यातील विद्यार्थी वर्गाचे अनधिकृत शाळेत शैक्षणिक नुकसान होऊन देणार नाही जर शिक्षण विभागामार्फत जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले तर ठाणे महापालिकेचे शिक्षण विभागाच्या विरोधात ठिय्या देऊ.अशा इशारा युवक उपाध्यक्ष सौरव आढांगळे यांनी दिला.
१ जुलै रोजी अनधिकृत शाळांच्या विरोधात बेमुदत बंद जो पुकारला आहे त्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे असे सांगण्यात आले. पाठिंब्याचे पत्र रिपाई-आ चे दिवा विभागाचे पदाधिकारी गंगाधर गायकवाड व बापुसाहेब भोसले यांच्या वतीने देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.