अखेर दातिवली गाव ते गणेश पाडा रेल्वे समांतर रस्ता मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या निधीतून पूर्णतत्वास….
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता 5 एप्रिल : दिव्यातील दातीवली गावातील अनेक वर्षांपासून दातीवली गाव व गणेशपाडा परिसरातील लोकांची मागणी असलेला दातिवली गाव ते गणेश पाडा रेल्वे समांतर रस्ता डांबरीकरण शिवसेनेचे दिवा शहरप्रमुख तथा मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या विशेष निधी मधून करण्यात आला आहे. तसेच मा. नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या मागणीनुसार दातीवली रेल्वे फाटक ते गणेशपाडा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्याची प्रत्यक्ष पाहणी करताना शिवसेनेचे दिवा शहरप्रमुख व मा. उपमहापौर श्री. रमाकांत मढवी, मा. नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, विभागप्रमुख श्री. चरणदास म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अनेक अडचणींवर मात करत अखेर रस्ता पूर्ण झाला तसेच रहिवासीयांच्या समस्येकडे शिवसेनेने वेळोवेळी लक्ष केंद्रित करीत समस्त दिवावासियांच्या पाठीशी भक्कमपने उभे आहोत विरोधकांना अनेक गोष्टीचा विरोध करुद्या आम्ही दिवेकर नागरिकांसाठी कामे करीत राहू दिवावासिय तुमच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही असे यावेळी मढवी यांनी बोलताना स्पष्ट केले.