बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ठाणे जिल्ह्यात आरटीई २५% मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू…

अमित जाधव - संपादक

ठाणे, जिल्हा परिषद ठाणे, दि. १६:-ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिकामध्ये एकूण २ हजार ६१६ पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८२८ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून दिलेल्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_newhttps://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या वेबसाईटवर दि. १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ रोजी पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या (वंचित गट – SC/ST/NT/VJ/OBC/SBC , दुर्बल गट- १ लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग बालकांचे ४०% अपंगत्व असल्यास) जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रकियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे