बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

जागतिक कर्करोग दिनानिमित्त मोफत कर्करोग तपासणी शिबीर* … *शिबिरात एकूण १२० महिला अंमलदारांची मॅमोग्राफी तपासणी..

अमित जाधव - संपादक

ठाणे -जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय , ठाणे, गोपाळ कृष्ण चारिटेबल ट्रस्ट व अनिल कॅन्सर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर आस्थापनेवरील वय ४० वर्ष पुर्ण असलेल्या महिला पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार यांच्यासह त्यांचे कुटुंबियांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री. आशुतोष डुंबरे (पोलीस आयुक्त, ठाणे शहर ) हे होते तर कार्यकमाचे उदघाटन डॉ अशोक नांदापूरकर ( उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे ) यांनी केले.
यावेळी डॉ अनिल हेरूर, (कर्करोग शल्य चिकित्सक, विभाग प्रमुख, फोर्टीस हॉस्पिटल तथा संचालक अनिल कॅन्सर क्लिनिक ), डॉ स्वप्नील विसपुते (मुख कर्करोग तज्ञ), डॉ रमेश राठोड ( वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, शेंद्रूण शहापूर ), पोलीस निरीक्षक प्रकाश वारके (नियंत्रण कक्ष, ठाणे शहर ), शामकुमार चव्हाण ( राखीव पोलीस उप निरीक्षक, मुख्यालय ठाणे शहर) तसेच आयोजक डॉ माधव वाघमारे ( वैद्यकीय अधिकारी, पोलीस रुग्णालय, ठाणे शहर ) यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला पोलीसअधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती.
सिद्धी हॉल, ठाणे शहर येथे बुधवारी (ता.५) रोजी डॉ अशोक नांदापूरकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन संपन्न झाले. महिलांची मॅमोग्राफी करण्यासाठी अनिल कॅन्सर क्लिनिक यांचे अत्याधुनिक यंत्रसामुग्री व सुविधानी सज्ज असलेल्या वाहनामध्ये ( ५ ते ६ फेब्रुवारी दरम्यान ) ठाणे शहर ५४, शुक्रवारी (७ फेब्रुवारी ) रोजी कल्याण परिमंडळ ३९, शनिवारी (८) रोजी उल्हासनगर परिमंडळ २७ अशी एकूण १२० महिलांची मॅमोग्राफी व इतर तपासणी करण्यात आली. साधारणपणे कर्करोग कशामुळे होतो हे बऱ्याच महिलांना माहिती नसल्याने महिला पोलीस अंमलदार आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कर्करोगा बद्दल जाणीव जागृती निर्माण व्हावी याकरिता महिलांच्या आरोग्याची तपासणी करणे व त्यांना रोगाबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे वाटल्याने सदर शिबीर आयोजित केले असून तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ते उपचार देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.माधव वाघमारे ( वैद्यकीय अधिकारी, पोलीस रुग्णालय, ठाणे ) यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस रुग्णालय येथील डॉ माधव वाघमारे, आरोग्य सेवक कुशल सुखदरे, श्रीमती रिया उत्तेकर, पूजा पवार, रमेश जाधव आदींनी परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी केले.कर्करोग हा प्रामुख्यानं स्तन, अंडकोष, लिम्फ नोड्स ( लसीका ग्रंथी) आणि शरीराच्या मऊ उतींमध्ये होतो. जर कर्करोगाचे लवकर निदान झाले तर त्यावर खात्रीशीर उपचार करणे शक्य होते.यासाठी महिलांना कर्करोग नेमका कशामुळे होतो व तो कसा ओळखावा, त्याची लक्षणें कोणती असतात तसेच आपल्याला कॅन्सर होऊच नये यासाठी महिलांनी जागरूक होऊन आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे आवाहन

डॉ अनिल हेरूर (कर्करोग शल्य चिकित्सक ) यांनी केले आहे.

पोलीस दलात काम करणाऱ्या महिलांचे कर्तव्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. सध्या सगळीकडे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून वयाची ४० वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिलांनी कोणती काळजी घ्यावी यासाठी त्यांना मार्गदशन मिळणे गरजेचे असून जागतिक कर्करोग दिनानिमित्त पोलीस रुग्णालय, ठाणे यांनी महिला पोलिसांच्या आरोग्याची तपासणी शिबीर घेऊन एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे