_भांडुपमध्ये बहुजन क्रांती मोर्चा च्या कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद_
अमित जाधव-संपादक
*_भांडुपमध्ये बहुजन क्रांती मोर्चा च्या कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद_*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
भांडुप/वार्ता,
बहुजन क्रांती मोर्चा आणि श्रीगणेश कॉ. ऑप.सोसायटी यांच्या सयुंक्त विद्यमाने राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता फातिमा शेख या बहुजन महानायिकांचा संयुक्त जयंती सोहळा रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी श्रीगणेश कॉ. ऑप. हौसिंग सोसायटी रमाबाई आंबेडकर नगर नं.२ भांडुप (प.) या ठिकाणी अफाट जनसमुदायाच्या उपस्थित पार पडला.
या कार्यक्रमाचे उदघाटन श्रीगणेश कॉ. ऑप. हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष तथा मुंबई महानगर पालिकेचे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत जाधव यांनी केले तर या ऐतिहासिक कार्यक्रमाचे नेतृत्व आणि अद्याक्षता बहुजन क्रांती मोर्चाच्या महिला मुंबई प्रदेश संयोजिका अर्चनाताई चंदनशिवे यांनी केली. आपल्या क्रांतिकारी भाषण शैलीने महानायक, महानायिकांचा क्रांतिकारी इतिहास पुराव्यानिशी सांगत अफाट जमलेल्या जनसमुदायाला आश्चर्य चकित केले.या कार्यक्रमाला टिटवाळा,ठाणे, नवी मुंबई, मुंबई या विभागातून लोकआलेले होते तर मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.कोरोनाचे सर्व नियम पाळत कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांनी, प्रमुख वक्त्यांनी, बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात औरंगजेबाचे राज्य अर्थात मोगलाई यायला पाहिजे होती, पेशवाई कशी आली? या ज्वलंत विषयावर अनेकांनी आपले परखड विचार मांडले.यावेळी प्रमुख अथिती म्हणून नाना भिसे, (अध्यक्ष बिन मुंबई प्रदेश), संदीप राजापूरकर, दीपकभाऊ पाहुरकर, रुपाली भडके, स्नेहाप्रभा अहिरे लोखंडे, श्रद्धा जैस्वार, संतोष केदारे,सतीश गजधने, बापू भडके, राहुल कांबळे, जगन तेलंग, अनंत सुरोवसे,विनोद इंगळे, सुनील कांबळे, आदी उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत गायकवाड, जनार्धन महाडिक, गोपाळ कांबळे, गौतम पारवे, योगेश महाडिक, प्रतीक सोनवणे, बाळनाथ गायकवाड,अमर नवघरे, सुधाकर नाईक, महेश सावंत, गोपीचंद धनेश्वर,सूर्यकांत परब, सुनील पार्टे,अरुण कांबळे,विजया जाधव, जोस्ना महाडिक, मीना पारवे, मनीषा कांबळे, रेखा गायकवाड,सुनीता सोनवणे, सविता कदम, प्राजक्ता डिंगणकर, श्रद्धा धरणे, व श्रीगणेश कॉ. ऑप.हौसिंग सोसायटीचे सर्व सभासदांनी फार परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.यावेळी राष्ट्रव्यापी जनआंदोलन निर्माण करण्यासाठी जनआंदोलन निधी 2700 रुपये मा.अर्चनाताई चंदनशिवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला,शेवटी आभार प्रदर्शन गौतम पारवे यांनी केले.