वंचित बहुजन आघाडी दिवा विभागाची सभा ठाणे शहर येथे आयोजित करण्यात आली होती.
ठाणे शहर अध्यक्ष आयु. महेंद्र अनभोर , ठाणे शहर महासचिव आयु.मोहन नाईक , दिवा विभाग अध्यक्ष आयु. मिलिंद गवई तसेच सर्व दिवा विभाग कार्यकर्णी यांच्या उपस्थित दिवा शहरातील एक स्वाभिमानी शिक्षक या नावाने प्रसिद्ध ओळखले जातात ते म्हणजे आयु. राहुल जोगदंड (सर)तसेच बहुजन समाज पार्टी या पक्षाचे दिवा विभाग माजी अध्यक्ष आयु.प्रमोद खांबे यांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष बहुजनांचे नेते ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन यांनी मोठया उत्साहात पक्ष प्रवेश केला त्या बदल आपले दोघांचे सर्व दिवा विभागीय कार्यकर्णी पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांनी अभिनंदन करत आपला पक्ष प्रवेश हा एक वंचित बहुजन आघाडी ला दिव्या मध्ये यश प्राप्त करून देईल अशी अपेक्षा केली असे नितेश दिनकर इंगोले दिवा विभाग सचिव यांनी यांनी यावेळी बोलताना सागितले.