डोंबिवलीतील लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; १० बारबालासह २२ जणांना अटक…
अमित जाधव-संपादक
डोंबिवलीतील लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; १० बारबालासह २२ जणांना अटक
डोंबिवली : मानपाडा पोलिसांनी सेव्हन स्टार लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकून १० बारबाला महिलांसहित ग्राहक, वेटर, हॉटेल मालक अशा एकूण २२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर सेव्हन स्टार नावाने लेडीज ऑर्केस्ट्रा बार आहे. याठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गाण्यावर अश्लील नृत्य आणि जमिनीवर बसून बीभत्स नृत्य करतात आणि नृत्य करणाऱ्या बारबालांवर पैसे उडवतात, अशी माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून मानपाडा पोलिसांच्या पथकाने काल रात्रीउशिरा या डान्स बारवर अचानक छापा टाकला.
सेव्हन स्टार बारमधून १० बारबालाना अश्लील नृत्य करत असताना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ७ ग्राहक आणि १ म्युझिक ऑपरेटर, ३ वेटरसह बारमालक अशोक पंडा असे एकूण २२ जणांवर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही सेव्हन स्टार बारवर कारवाई झाली होती. शिवाय कल्याण डोंबिवली क्षेत्रातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक लेडीज ऑर्केस्ट्रा बार असून यामधील बहुतांश बारवर अनेकदा छापेमारी करून देखील बारमधील छमछम काही थांबताना दिसत नाही आहे.