बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

शहरातील सखल भागात बसविण्यात आलेल्या पाणी उपसा पंपाची अधिका-यांनी केली पाहणी…

अमित जाधव-संपादक

शहरातील सखल भागात बसविण्यात आलेल्या पाणी उपसा पंपाची अधिका-यांनी केली पाहणी

ठाणे : पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचल्यास ते तातडीने बाहेर काढण्यासाठी शहरातील सखल भागात पाणी उपसा पंप बसविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास दिले होते, त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी पाणी उपसा पंप बसविले आहेत,ते सुस्थितीत असल्याची खबरदारी घेऊन ते योग्य ठिकाणी बसविले आहेत की नाहीत, याबाबत मा महापालिका आयुक्त सो यांचे निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री जी जी गोदेपुरे यांनी पाहणी केली.

आज सकाळी ८ वाजता सुमारास उप-आयुक्त जी.जी. गोदेपुरे ,उपनगर अभियंता (यांत्रिकी) श्री. गुणवंत झांबरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. अविनाश सावंत, उप अभियंता (यांत्रिकी) श्री मंदार अधिकारी,कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)श्री. अभिषेक सुर्वे यांनी पावसाळ्याच्या कालावधीत पाणी साचणाऱ्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या पाणी उपसा पंपाची पाहणी केली आहे.

भांजेवाडी (05-HP चे दोन पंप),चिखलवाडी, एम.जी. रोड (15-HP चा सबमर्सिबल एक पंप जनरेटरसह),पंपिग स्टेशन, भास्कर कॉलनी (10-HP चा एक ट्रॉली माउंट डिझेल पंप),सिडको रेल्वे ब्रीज (10-HP चा एक डिझेल पंप), विटावा रेल्वे ब्रीज, ठाणे-बेलापूर रोड (15-HP चा इलेक्ट्रिक सबमर्सिबल एक पंप जनरेटरसह, 10-HP चे दोन डिझेल पंप, 15-HP चा एक डिझेल पंप), आनंद नगर व्यायामशाळा (05-HP चे दोन पंप),लव-अंकुश सोसायटी (05-HP चे एक पंप), पोलिस लाईन क्राईम ब्रांच (10-HP चा एक ट्रॉली माउंट डिझेल पंप) येथे बसविण्यात आलेल्या पंपाची पाहणी यावेळी करण्यात आली.

तसेच दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, आनंदनगर जिम, दत्तवाडी, ठाणे महानगरपालिका मुख्यालय आपत्कालीन कक्ष , दशरथ कुटीर सोसायटी माजीवडा प्रभाग समिती, वाघबीळ गाव , लवकुश सोसायटी कोपरी, दाभोळकर चाळ आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी पोर्टेबल पंपाची व्यवस्था करण्यात येत आहे.

दरम्यान अतिवृष्टीच्या काळात ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध भागात पाणी साचल्यास नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या आपत्कालिन विभागाच्या १८०० २२२१०८ या टोल फ्री आणि ०२२ २५३७१०१० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे