
अनेक विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान विषयाची भिती वाटते. पण या दोन्ही विषयात बोर्ड परिक्षेला 20 गुण मिळाले तरीही दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. याआधी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत 35 गुण अनिवार्य होते. पण आता 20 गुण करण्यात आले. महाराष्ट्र बोर्डाने हा निर्णय घेतला. त्यामुळे बोर्ड परीक्षेत या दोन्ही विषयांमध्ये प्रत्येकी 20 गुण असतील तरीही विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश मिळेल.