आपले सरकार सेवा अंतर्गत NIC Application आणि जी २ जी या सेवा निर्गतीमध्ये ठाणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय…
अमित जाधव - संपादक
ठाणे – जी २ जी सेवा निर्गतीमध्ये अर्थात १ ते ३३ नमुने संगणकीकृत करून ग्रामपंचायतीचे विविध दाखले, उतारे वितरित करण्यासाठी विकसित केलेल्या महाईग्राम पोर्टलमधून ठाणे जिल्हा परिषदने राज्यात सर्वाधिक सेवा निर्गमित केल्या आहेत. या जी २जी सेवेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला तसेच प्रिया सॉफ्ट, प्लान प्लस, एम – आक्शन सॉफ्ट यासर्व एन आय सी एप्लिकेशन्स यात देखील राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. ठाणे जिल्हा परिषदने आपले सरकार सेवा केंद्रातून प्रत्येक ग्रामपंचायतीने ९७ टक्के सेवा वितरीत करण्यात आले आहे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिदंल याचे मार्गदर्शन मिळाले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री. प्रमोद काळे यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यात जी २ जी, एन आय सी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
ठाणे जिल्हा परिषद जी २ जी, एन आय सी मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला हि अभिमानास्पद बाब आहे. यासाठी गटविकास अधिकारी, जिल्हा समन्वयक श्री. प्रदिप पाटील व सर्व तालुका समन्वयक यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करुन उत्तम कामगिरी बजावली आहे.- श्री. प्रमोद काळे, ग्रामपंचायत विभाग प्रमुख यांनी कळविले आहे