बालसंगोपन योजनेत एकल म्हणजे ज्यांचे आई किंवा वडील मरन पावले आहे अशा पालकांच्या मुलांना मिळतात दर महिन्याला २२५० रुपये,पहा अर्ज कसा करायचा….
अमित जाधव - संपादक
बालसंगोपन योजनेत एकल म्हणजे ज्यांचे आई किंवा वडील मरल पावले आहे अशा पालकांच्या मुलांना मिळतात दर महिन्याला २२५० रुपये….
आज १ एप्रिल. बालसंगोपन योजनेत आजपासून मुलांना २२५० रुपये मिळणार आहेत.
बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते.या योजनेत कालपर्यंत ११०० रुपये मिळत होते .ते आज एक एप्रिल पासून २२५० रू मिळणार आहेत. तेव्हा आपल्या आजूबाजूच्या विधवा महिला व अनाथ बालकांना ही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
ही योजना कोणाला मिळते..?
एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा HIV बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्याच्या मुलांना ही योजना मिळते.
वयाची अट काय आहे ?
अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोघानाही प्रत्येकी २२५०रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.
*यासाठी उत्पन्न अट किती आहे ?*
पालकाचे उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे
घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांना हा लाभ मिळतो का ?
होय,कारण त्या एकल महिला असल्याने नक्की लाभ मिळतो फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावेत.
अर्ज घेवून कोठे जावे ?
अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या गावी बालकल्याण समिती समोर सोबत मुलांना नेऊन फॉर्म जमा करावा. बालकल्याण समिती कार्यालय शक्यतो मुलांच्या अभिरक्षण गृहात असते.सोबत ज्यांचा फॉर्म भरला आहे त्या मुलांना सोबत नेणे सक्तीचे आहे.
या अर्जाला कोणती कागदपत्र जोडणे आवश्यक आहे ?
याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून घ्यावा
१) योजनेसाठीचा विहीत नमुन्यातील अर्ज
२)पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेराँक्स
३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
४) तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्युचा दाखला
६) पालकाचा रहिवासी दाखला.
(ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा)
७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक
८) मृत्यूचा अहवाल – ( कोविडने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल)
९) रेशनकार्ड झेराँक्स .
१०) घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा रंगीत फोटो ( दोन मुले असल्यास दोन्ही मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो )
१०) मुलांचे ३ पासपोर्ट फोटो
*दरवर्षी या योजनेचे *नूतनीकरण* करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवावे
आपल्या परिचयाच्या या निकषात बसणाऱ्या मुलांच्या एकल पालकांना ही योजना समजावून सांगा व ही योजना मिळवून द्यायला मदत करावी. दोन मुले असतील तर दर महिन्याला ४५००रुपये या मुलांना शिक्षणासाठी मिळू शकतील..
या योजनेचा जास्तीत जास्त प्रसार करा.
हेरंब कुलकर्णी
राज्य निमंत्रक
साऊ एकल महिला समिती
फॉर्म भरताना अडचण आली तर आमचे अभ्यासू सहकारी मुकुंद टंकसाळे यांना फोन करावा.फक्त फॉर्म अडचणी विचाराव्यात. इतर माहिती मेसेजमध्ये आहे. फोन
9665515829