ब्रेकिंग
आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा लातूरमध्ये..

आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा लातूरमध्ये
राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा लातूरमध्ये दाखल झाला आहे. जातीवाचक आणि धर्मविरोधी कमेंट करुन पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी मुरुड गावच्या सरपंचांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नागटिळक असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान राज्यात निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहिता भंग करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.