बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शासनाच्या ” सर्वांसाठी घरे 2022 च्या धोरणाची अंमलबजावणी करून मुंबई महानगरात भाड्याने राहणाऱ्या बेघर कुटुंबांना हक्काचे घरकुल द्या —- अन्यथा 26 मार्च रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन ——–भाई जगदीश कुमार इंगळे —————————————- मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

अमित जाधव - संपादक

———————————–
* मुंबई (प्रतिनिधी ) केंद्र व राज्य सरकारने “सर्वांसाठी घरे 2022 चे धोरण ” घोषित केले त्याची अंमलबजावणी अद्याप पर्यंत झाली नसल्याने मुंबई महानगरातील भाड्याने राहणाऱ्या बेघर कुटुंबांना अद्यापही हक्काचे घरकुल मिळाले नसल्याने रहिवाशांना नायईलाजास्तव
* भाड्याच्या घरात राहावे लागत आहे . त्यामुळे शासनाने त्वरित योजनेची अंमलबजावणी करून बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे प्रणेते भाई जगदीशकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे यांच्या नेतृत्वात आणि घरकुलापासून वंचित महिलांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार व मुख्य सचिव तसेच आझाद मैदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून मुंबई महानगरात भाड्याने राहणाऱ्या बेघरांना हक्काचे घरकुल न दिल्यास दिनांक 26 मार्च रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही महासंघाचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या वतीने वनिताताई कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
” सर्वांसाठी घरे शासनाचे धोरण , तर बेघर कुटुंबाचे अजूनही हक्काच्या घरासाठी का होत आहे मरण “असा संतप्त सवाल लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला विचारण्यात आला आहे .
केंद्र व राज्य सरकार एकीकडे “सर्वांसाठी घरे 2022 मध्ये योजना जाहीर करते परंतु आजही मुंबई महानगरात राहणाऱ्या लोकांना हक्काचे घर नसल्याने यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे घराचे भाडे दाम दुप्पट होत असल्यामुळे भाडे भरणे कठीण झाले आहे. ज्या लोकांना हक्काचे घर नाही अशा लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे. खाजगीकरणामुळे अनेक संकटांना सामोरे जात असताना रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. रोजगार बंद झाल्याने पैसे मिळत नाहीत, अपुऱ्या मिळणाऱ्या पैशांमध्ये मुलांचे शिक्षण ,रोजच्या दैनंदिन गरजा अशी बेघर लोकांना जगण्याचा व राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे या योजनेची अंमलबजावणीच होत नसल्यामुळे गरजवंतांना घराचा लाभ मिळत नाही त्यामुळे शासनाने या गंभीर बाबीचा विचार करून मुंबई महानगरातील बेघर नागरिकांना शासनाच्या सर्वांसाठी घरे योजनेची त्वरित अंमलबजावणी करून सर्व भाडेकरूंना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याच्या धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय त्वरित काढून भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांना हक्काचे घर देण्यात यावे असा इशाराही लेखी निवेदनाद्वारे मुंबई भाडेकरू रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे व मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे व सचिव कविता निकाळजे, संघटक वर्षा गावंड ,शारदा जयस्वाल यांनी दिला असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी सांगितले.
मुंबई शहरात भाड्याने राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारने सन 2022 चे “सर्वांसाठी घरे योजनेचा” शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे