ब्रेकिंग
मध्य रेल्वे विस्कळीत,टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत..
अमित जाधव - संपादक

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे डाऊन दिशेच्या सर्वच लोकल गाड्या पूर्णपणे बंद झाल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कसाऱ्याहून येणारी “गरीब रथ मेल” आसनगावला थांबवण्याची शक्यता आहे.