
लोकल अपघात ! GRP कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका जीआरपी कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. विकी बाबासाहेब मुख्यादल असे त्यांचे नाव आहे. कसारा लोकल प्रवाशांनी गच्च भरलेली होती. काही प्रवासी दरवाज्याजवळ लटकून प्रवास करत होते. त्याच वेळी दुसरी लोकल त्यांना घासून गेली. यात अनेक प्रवासी खाली कोसळले. मात्र, या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत.