महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशनच्या(MESTA)च्या ठाणे जिल्हा अद्यक्षपदी आर.एन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक श्री.नरेश पवार यांची नियुक्ती……
अमित जाधव-संपादक
महाराष्ट्रातील नावाजलेली व अनेक शाळेच्या संचालकासह सभासत्व घेऊन शाळेच्या विविध समस्यांवर लढा देऊन प्रशासनास जागरूकता निर्माण करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टिज असोसिएशन अर्थात (MESTA )च्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी दिव्यातील आर.एन विद्यालय आणि जुनीअरकॉलेज चे संस्थापक मा.नरेश पवार यांची ठाणे जिल्हा अद्यक्ष पदी निवड तर साईनाथ म्हाञे-ठाणे जिल्हा उपाध्यक्ष-मेस्टा, नरेश कोंडा-ठाणे जिल्हा सचिव- मेस्टा ,उत्तम सावंत ठाणे जिल्हा – सहसचिव ठाणे जिल्हा कमिटी ची निवड
करण्यात आली.मेस्ता चे संस्थापक अध्यक्ष श्री.संजयराव तायडे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
श्री नरेश पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले माझ्यावर विश्वास दाखवून दिलेली जबाबदारी मी योग्य यशस्वीरीत्या पार पाडून ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळेंवर विशेष केंद्रित लक्ष करून होणाऱ्या समस्यां निवारण्यासाठी प्रयत्नशील असेन असे त्यांनी स्पष्ट केलं व आभार मानले .