
रे मिस्टेरियो सीनियर यांचे निधन
प्रसिद्ध मेक्सिकन कुस्तीपटू रे मिस्टेरियो सीनियर (Rey Misterio Sr) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मिस्टेरियो सीनियर यांनी वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन आणि लुचा लिब्रे एएए वर्ल्डवाइड सारख्या प्रमुख रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले. रे मिस्टेरियो सीनियर हे केवळ प्रसिद्ध कुस्तीपटूच नव्हते तर अनेकांचे मार्गदर्शक देखील होते.