दिवा रेल्वे प्रवासी यांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश,अध्यक्ष विजय भोईर यांच्या अथक प्रयत्नांनी अखेर फलाटावर शौचालय निर्माण..
अमित जाधव - संपादक
दिवा रेल्वे प्रवासी यांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश….
अध्यक्ष विजय भोईर यांच्या अथक प्रयत्नांनी अखेर फलाटावर शौचालय निर्माण..
ठाणे, दिवा. ता 7 जाने: दिवा रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म न. ५/६ वरून दिवा ते रोहा, पनवेल, वसई तसेच काही कोकणातल्या जाणाऱ्या गाड्या नियमित सुटत असतात परंतु तिकडे प्रवाश्यांना सुलभ शौचालयाची कोणतीही सोय नव्हती. लहान मुलं, महिलांची त्यामुळे खूपच गैरसोय होत असे.संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री विजय अनंत भोईर व त्यांचे सहकारी या अनुषंगाने वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत राहिल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने उशिरा का होईना या मागणीची दखल घेऊन प्लॅटफॉर्म क्र ५ व ६ वर शौचालयाचे बांधकाम सुरू झाले आहे. रात्री अपरात्री ५/६ क्र फलाटावर लहान मुलं, आबालवृद्धांचे, महिलांचे खूपच शौचालया अभावी हाल होत असे. त्याबद्दल आम्ही रेल्वे प्रशासन तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांचे संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे विजय भोईर यांनी आभार मानले.
संघटनेच्या वतीने प्रवसियांसाठी आम्ही नेहमी तत्पर असून कोणत्याही समस्या उद्भवत असल्यास संघटना सर्वतोपरी सोडविण्याचा प्रयत्न करेल असे बोलताना स्पष्ट केले.