ब्रेकिंग
मुंबईच्या आझाद मैदानात क्रिकेट खेळताना एका 31 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…
अमित जाधव - संपादक

मुंबईच्या आझाद मैदानात क्रिकेट खेळताना एका 31 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अशोक देशमुख असे इंजिनिअरचे नाव आहे. सामन्यात 10 वा ओव्हर सुरु असताना अशोकने हृदयात वेदना होत असल्याचे म्हटले. पण तरी त्याने खेळ सुरुच ठेवला. 17 व्या ओव्हरमध्ये धाव घेत असताना अशोक अचानक कोसळला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता.