रेल्वे प्रवाशांच्या समस्येसाठी रेल्वे वाणिज्य मंडळाकडून दिव्यातील ११ सदस्य…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता २७ डिसें : दिवा शहरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी मध्य रेल्वे मंडल कार्यालयाच्या वाणिज्य शाखा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) मुंबई तर्फे स्टेशन सल्लागार कमिटी नेमण्यात आली असून सदर कमिटी मध्ये दिवा शहरातून 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अमृत भारत योजने अंतर्गत दिवा जंक्शनला समाविष्ट करण्यात आले आहे. दिवा शहरातील वाढती लोकसंख्या पाहता दिव्यातील सामान्य लोकांना रेल्वे प्रवास हा सुखकर होण्यासाठी दिवा शहरातील लाखों दिवेकर रेल्वेने प्रवास करण्यास पसंती करतात परिणामी रेल्वेच्या सुविधांवर मोठा ताण पडतो , कधी कधी प्रवाश्यांना नाहक त्रास देखील सहन करावा लागतो , बऱ्याचदा रेल्वे प्रशासन आणि प्रवाशी यांच्यात शाब्दिक वाद देखील उद्भवतात भविष्यात असे प्रसंग उद्भवू नये तसेच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रवासी यामध्ये समतोल राखण्यासाठी प्रवाशांच्या समस्या समजून घेऊन रेल्वे प्रशासनास मांडण्यासाठी दिवा स्टेशन सल्लागार कमिटीत दिवा शहरातून 11 सदस्यांची करण्यात आली आहे. १) विजय भोईर २) सचिन भोईर ३) समीर चव्हाण ४) रोशन भगत ५)विनोद भगत ६) राजेंद्र आंब्रे ७) सुरेंद्र यादव ८) जव्हेरचंद जोशी ९) नीलम मिश्रा १०) नितीन कोरगांवकर ११) रत्नेश तिवारी यांचा समावेश असून यामुळे रेल्वे प्रशासन आणि रेल्वे प्रवाशी यांच्या मधील एकोपा टिकवण्याचे काम हे सदस्य करतील स्टेशन परिसरातील समस्या रेल्वे प्रशासनसमोर मांडण्याचे काम ही समिती करेल. एकप्रकारे रेल्वे प्रवाशी आणि स्टेशन प्रशासन यांच्या मधील कोऑर्डिनेशन चे काम ही समिती करेल असे मध्य रेल्वेचे सी सी आय श्री चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.