| पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नेहमी शिंदे गटाला धारेवर धरत टीकास्त्र सोडलं आहे. अशातच शिंदे गटाने मोठा डाव खेळला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे अडसरकर (Vaijnath Waghmare Adsarkar) यांचा आज एकनाथ शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या, “प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं. प्रत्येकाचा भूतकाळ असतो. तो कुरतडण्याचं कारण नाही.” भावना गवळी शिंदे गटात आहेत. त्यांचे पती कॅप्टन सुर्वे आमच्या पक्षात आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात आहेत. तर त्यांचे चिरंजीव आमच्या पक्षात आहेत. त्यामुळे या टॅक्टिस केवळ राजकीय टॅक्टिस म्हणून पाहते, असं मत सुषमा अंधारे यांनी मांडलं.पुढे त्या म्हणतात, त्यांनी काय निर्णय घ्यावा, कुठे जावं? कुठे जाऊ नये? हा त्यांचा प्रश्न आहे. तो विषय चर्चेचा होण्याचं कारण नाही. भविष्यात काय चित्रं असेल हे सांगता येत नाही. पण त्यावेळी कर्तव्य हे श्रेष्ठ असेल. मी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे, असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.