बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी दिनी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेतर्फे जागतिक महिला दिन साजरा..

अमित जाधव-संपादक

सावित्रीबाई फुले पुण्यतिथी दिनी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेतर्फे जागतिक महिला दिन साजरा

मुंबई : अनेक कर्तुत्ववान महिला कौटुंबिक जबाबदारी सांभाळून विविध क्षेत्रातही कार्यरत आहेत. शिक्षिका , डॉक्टर , समाजसेविका , कायदेविषयक सल्लागार , लेखिका , कवियत्री गायिका , साहित्यिक , कला , क्रीडा सांस्कृतिक , आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील कार्यरत 81 कर्तबगार महिलांना महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या मुंबई विभागाच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधत जागतिक महिला दिनाचे ऑनलाइन द्वारे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ऑनलाइन कार्यक्रम लेखिका , निवेदिका , कवियत्री अनघा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे राज्य सहसचिव तथा तंत्रस्नेही शिक्षक श्री.भानुदास शिंदे यांनी केल होते. ऑनलाईन तंत्रज्ञानाची संपूर्ण धुरा अविनाश पाटील व रोहिणी वराडकर यांनी सांभाळली.सूत्रसंचालन मिता तांबे यांनी केले व आभार प्रदर्शन मनीषा जाधव यांनी केले. घाटकोपर येथील सरस्वती विद्यालयातील शिक्षिकांचा संघटनेच्या वतीने संघटनेच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा मिता तांबे व राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे