बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात चिन्मय हाईटस, आर एन नगर येथे ओम साई कन्ट्रक्शन चे मालक नरेश पवार यांच्या कार्यालयात आग…

अमित जाधव - संपादक

दिनांक २५/०८/२०२४ रोजी २२:४४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  चिन्मय हाईट्स, बेडेकर नगर, दिवा आगासन रोड दिवा. (पू). या ठिकाणी चिन्मय हाईट्स ८ मजली इमारतीमधील पहिल्या मजल्यावरती असलेल्या मे. ओम साई कन्स्ट्रक्शन मालक- श्री. नरेश पवार,  या तात्पुरत्या स्वरूपात बंद असलेल्या ऑफिस गाळ्यामधील इन्वर्टरला व बॅटरीला आग लागली होती. सदर घटनास्थळी टोरंट पॉवर कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह ०१- रेस्क्यू वाहन उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी मे. ओम साई कन्स्ट्रक्शन या ऑफिस गाळ्या मधील इन्वर्टरला व बॅटरीला लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने २३:२० वाजताच्या सुमारास पुर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे