दिव्यातील पाणी टंचाई ग्रस्त भागात भाजप चे रोशन भगत यांच्या मार्फत मोफत टँकर ने पाणीपुरवठा…..
अमित जाधव-संपादक
दिव्यातील पाणी टंचाई ग्रस्त भागात भाजप चे रोशन भगत यांच्या मार्फत मोफत टँकर ने पाणीपुरवठा…..
भाजप चे ओ बी सी मोर्चाचे दिवा शीळ अध्यक्ष रोशन भगत व सपना रोशन भगत(आदर्श मित्र मंडळ-अद्यक्ष) यांनी दिव्यातील स्थानिक पद्धधिकार्यांच्या मदतीने पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी स्वखर्चातून नागरिकांना इमारती व चालीं मध्ये टँकर मार्फत पाणी पुरवत आहेत त्यामुळे रहिवासीयांना थोडासा दिलासा मिळत असून सदर रहिवासीयांनी येथील नगरसेवक व ठाणे महापालिकेवर नाराजी व्यक्त केली असून आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे काही भागात टँकरने सुद्धा पाणी पोहचत नाही असे काही नागरिकांनी स्पष्ट केलं त्यामुळे अशी काही परिस्थिती असताना प्रभागातील भाजप चे रोशन भगत व सपना रोशन भगत यांनी स्वखर्चातून अधिक टंचाई ग्रस्त भागात मोफत टँकरने पाणी पुरवठा करून नागरिकांना दिलासा देत आधार दिला आहे,.
प्रभागातील नागरिक कोणत्याही सुविधे पासून वंचित न राहता पुढेही आम्ही नागरिकांची अशीच सेवा करून तात्पर्य राहू असे मा. रोशन भगत यांनी बोलताना स्पष्ट केलं.