ठाणे, दिवा ता २० ऑगस्ट : दिवा शहरातील बेडेकर नगर येथील डॉ. पराग जोशी यांचे मानव कल्याण मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आयोजित दिवा उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
डॉ. पराग जोशी यांचे मानवकल्याण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल दिवा आयोजित भव्य आरोग्य शिबिरात शेकडो दिवेकरांनी सहभाग नोंदवला. प्रसंगी मोफत मेडीकल आणि हेल्थ चेकअप शिबिरात हृदयरोग सल्ला व तपासणी (ECG), आस्थिरोग सल्ला व तपासणी, मधुमेह सल्ला व तपासणी, पोटाचे विकार सल्ला व तपासणी, स्त्रीरोगतज्ञ विषयक सल्ला व तपासणी करण्यात आले. मधुमेहचे औषधे मोफत दिली गेली. प्रसंगी असंख्य लोकांनी आपला सहभाग नोंदवला असून संपूर्ण शारीरिक तपासणी आरोग्य शिबीरात मोफत करण्यात आली. सदर शिबिरात अनेक मान्यवरांचे डॉ. पराग जोशी यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. प्रसंगीडॉक्टर आदी उपस्थित होते.