जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य या संस्थेला आय.एस.ओ. मानांकने सन्मानित….
अमित जाधव-संपादक
जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य या संस्थेला आय.एस.ओ. मानांकने सन्मानित
संजीव भांबोरे
भंडारा- (जिल्हा प्रतिनिधी)- जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य (कार्य क्षेत्र संपूर्ण भारत) च्या वतीने आज घडीला राजकीय , सामाजिक, शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ओ. सी .आय. स्कॉटलंड या संस्थेचे आय.एस.ओ.ने मानांकित केले आहे. निराधाराला आधार देणे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान अतर्गत व्यसने सोडा माणसं जोडा ,
विश्व जोडा, असा संदेश देऊन जनजागृती अभियान राबविण्यात आली. व बरीच लोकं व्यसन मुक्ती झाली.झाडे लावा ! पाणी वाचवा !! व पर्यावरण मुक्त होऊ या अभियाना अंतर्गत ठिकठिकाणी झाडे लावण्यात आली. दुष्काळात काही ठिकाणी टँकर ने पाणीपुरवठा करण्यात आला. कोल्हापूर येथील पुरग्रस्त झालेली असताना रेस्क्यू फोर्स च्या माध्यमातून उल्लेखनीय मदत कार्य पार पाडले. आणि यापुढे आरोग्यसेवा अंतर्गत आदिवासी व वाड्या तांड्यावर गरीब वस्तीत अल्प दरात विविध ठिकाणी उपचार करून देण्यात येणार आहे .असे अनेक संकल्पना संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात यापुढे राबविण्यात येणार आहे. आय.एस.ओ . मानांकन मिळाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांच्या व रेस्क्यू जवान व समाजसेवक वतीने संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर पोवार यांचे अभिनंदन केले जात आहे.