ब्रेकिंग
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात नदीवरील झुलता पूल कोसळण्याची घटना,घटनेचा व्हिडियो पहा बेधडक ठाणे न्युज वर…..
अमित जाधव-संपादक
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात नदीवरील झुलता पूल कोसळण्याची घटना घडली आहे. या अपघातात पुलावर उपस्थित असलेले अनेकजण नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे.
मोरबी येथील माचू नदीवरील शंभर वर्षे जुना पूल रविवारी (30 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास कोसळला. यावेळी पुलावर उपस्थित असलेले पर्यटक नदीत कोसळले. नदीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
पण पूल नेमका कशामुळे कोसळला, याची नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. या दुर्घटनेत 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.