दिव्यात अनेक रेशानिग दुकानदार ग्राहकांना पावती न देता देत आहेत धान्य,शेकडो नागरिकांच्या तक्रारी…..
अमित जाधव - संपादक
दिव्यात अनेक रेशानिग दुकानदार ग्राहकांना पावती न देता देत आहेत धान्य,शेकडो नागरिकांच्या तक्रारी…..
ठाण्यातील दिवा शहरात बहुसंख्य रेशन दुकानदार अंत्योदय योजनेतील लाभार्थींना धान्य खरेदीची पावती देत नाहीत. यामध्ये लाभार्थींची मोठी लूट होत असल्याचे आढळून आले आहे. लाभार्थींचे धान्य सदर काय करतो याचे अद्याप उलगडा लागत नसून या बाबतीत कृती समिती देखील हतबल झाली असून कृत्येक वेळा राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यावर काही किरकोळ कारवायांचा अपवाद वगळता सरकारी यंत्रणा ढिम्म आहे.
मुंबई, ठाण्यात सुमारे ४,२४१ शिधावाटप केंद्रे आहेत. रेशन घेतल्यानंतर लाभार्थींना पावती देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र बहुसंख्य दुकानदार कायदा धाब्यावर बसवत आहेत. लाभार्थींने धान्य कमी घेतले किंवा धान्याचा कोटा कमी आला आहे कारणे सांगून दुकानदार गरिब कुटुंबियांचे धान्य हडपतात व काळ्या बाजारात विकतात. खरेदी केलेल्या मालाची पावती देण्यास टाळाटाळ केली जाते. दुकानदार हे धान्य गहू १२ ते १५ रुपये तर तांदूळ २० ते २२ रुपये किलोने काळ्या बाजारात विकत असल्याचे रेशनिंग घेणारे नागरिक यांनी यावेळी बोलताना सांगितलं
राज्य सरकारचे धोरण कठोर नसल्याने दुकानदारांचे फावले आहे. शिधावाटप नियंत्रकांनी अलीकडेच मानखुर्द, नवी मुंबई, उलवे येथे काळा बाजारात विकले जाणारे धान्य छापा टाकून पकडले मात्र या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे. रेशन कार्ड आता आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत. रेशन दुकानांमध्ये लाभार्थींचे बायोमेट्रीक (अंगठ्याचा ठसा) करण्यात येते. त्यामुळे पावती देणे सहज शक्य आहे. रेशनिंग कृती समितीने याबाबत ठिकठिकाणी तक्रारी केल्यानंतर काही दुकानांमध्ये पावती दिले जाते आहे मात्र सर्वच दुकानात दिली जात नाही, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.