
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना एका प्रवाशावर संशय आला अन् त्याची चौकशी केली असता त्यांनाही धक्काच बसला. ब्राझीलवरून मुंबईला आलेल्या या प्रवाशाने चक्क शरीरात कोकेनच्या 170 कॅप्सूल दडवून ठेवल्या होत्या. गेल्या पाच दिवसांपासून त्याच्या शरीरातून साडेसोळा कोटी रुपयांचे कोकेन कॅप्सूल शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले आहे. या सर्व कॅप्सूलचे वजन 1 किलो 649 ग्रॅम इतके आहे.