ब्रेकिंग
दिवा शहरातून अव्वल येत कु.राजेश्वरी शशिकांत कोळी हिने दहावीच्या परीक्षेत ९६.४०% गुण…
अमित जाधव - संपादक

ठाणे -दिवा शहरातून अव्वल येत कु.राजेश्वरी शशिकांत कोळी हिने दहावीच्या परीक्षेत ९६.४०% गुण मिळवत अभिमानास्पद यश मिळवले. सर्वसामान्य कुटुंबाच्या पार्श्वभूमीतून आलेल्या राजेश्वरीने मेहनत घेऊन कोणतीही खासगी शिकवणी न लावता प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्याच्या जोरावर हे यश साध्य केलं. तिचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. राजेश्वरी च्या या घवघवीत यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन आज तिचा सत्कार करण्यात आला आणि भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.
यावेळी शिवसेना दिवा शहरप्रमुख/उपमहापौर श्री रमाकांत मढवी, नगरसेवक दीपक जाधव, युवती प्रमुख साक्षी रमाकांत मढवी, विभागप्रमुख निलेश पाटील, शाखाप्रमुख महेश पाटील, विनोद पाटील सर व राजेश्वरी चे आई वडील उपस्थित होते.