बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पत्रकाराची बदनामी करणाऱ्या वर समतानगर येथे गुन्हा दाखल….

अमित जाधव-पत्रकार

पत्रकाराची बदनामी करणाऱ्या वर समतानगर येथे गुन्हा दाखल

मुंबई सिद्धार्थ काळे दी१२शनिवार

भ्रष्टाचाराच्या अनधिकृत बांधकामाच्या बातम्या लावल्यामुळे पत्रकारांची बदनामी, पत्रकार खोटे गुन्हे, दाखल करणे, पत्रकारावर हल्ला करणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी वारंवार पत्रकार संघटना करत आहेत. असाच प्रकार समता नगर पोलीस ठाणे हद्दीतील कांदिवली या ठिकाणी घडला. विविध आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये, यूट्यूब चैनलवर, न्यूज पोर्टलवर,बातम्या लिहिणारे व पत्रकारिता करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पत्रकार संजय बोर्डे यांचा फोटो व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर वायरल केल्याप्रकरणी समता नगर पोलीस ठाणे येथे आनंद वसंत जाधव या समाजकंटकांवर कलम w ५००नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार संजय बोर्डे व त्यांचे सहकारी पत्रकार सिद्धार्थ काळे यांना सूत्रांकडून माहिती मिळाली की लोखंडवाला म्हाडा रोड क्रमांक एक येथे धोकादायक अनधिकृत बांधकाम सुरू आहे.सदर गोपनीय माहितीची सत्यात तपासणी साठी सदर ठिकाणी दोघे गेले असता.सदर ठिकाणचे गावगुंड आनंद वसंत जाधव या व्यक्तींनी मुद्दामून पत्रकार संजय बोर्डे यांना थांबाऊन त्यांच्या सोबत शिवीगाळ केली.सदर गावगुंड यांनी शाब्दिक चकमक केली.आमच्या विभगतल्या बातम्या लावता तुम्हाला काय करायचे आहे,तुम्हाला आम्ही बघून घेवू व त्यांनी पत्रकाराचा फोटो काढून सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुप वरती सदर फोटो बदनामीकारक मजकुरासह वायरल केला.
त्यानंतर पत्रकार संजय बोर्डे यांना एका व्यक्तीने सदर बदनामीकारक वायरल फोटो ची माहिती दिल्यानंतर पत्रकार संजय बोर्डे यांनी समता नगर पोलीस ठाणे येथे जाऊन सदर व्यक्तीचा विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद केला.

नुकतेच पत्रकारांच्या समस्या,पत्रकारांवर हल्ले, पत्रकारावर खोटे गुन्हे, या विषयावरती पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पत्रकार संरक्षण समिती मुंबईचे एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटले राज्यपालांनी सुद्धा यावर अधिकाऱ्यांना सांगून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे