आज राज्यातील दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात पुण्यातील तीन विद्यार्थ्यांनी चक्क 100 टक्के गुण मिळवले आहे. श्रृजा घाणेकर, प्राजक्ता नाईक आणि कैवल्य देशपांडे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यासोबतच लातूरमधील 123 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. तसेच राज्यातील एकूण 187 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. राज्यातील 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थी परीक्षेला बसले होते