बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी.. ! मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्ग्याविरोधात आवाज उठवला म्हणून धर्मांध शक्ती चां संताप…..

अमित जाधव - संपादक

मनसे नेते अविनाश जाधव यांना
जीवे मारण्याची धमकी.. !

ठाणे,ता.२५ प्रतिनिधी ;

मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मशिदी विरोधात आवाज उठवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांना धर्माध शक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धर्माधांच्या धमकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले असुन याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मस्जीद,मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उध्वस्त केले होते. तर, दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी,मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणुन प्रशासनाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. याचे पडसाद उमटताच जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली असतानाच काही मुस्लीम धर्मांध याविरोधात एकवटण्यास सुरुवात झाली. त्यातील काहींनी अविनाश जाधव यांना, ” हम उसे जिंदा नही छोडेंगे … कोई गुस्ताख छुप न पाएगा … हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे … ” अशा आशयाचा व्हीडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. एस आर कमिटी … बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हीडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही. अशी माहिती समोर आली आहे.दरम्यान, या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले असुन मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे