दिवा पोलिस चौकीत महिलाभगिनींनी पोलिस बांधवांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन…..
अमित जाधव - संपादक
ठाणे :पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारपासून दूर राहून आपले कर्तव्य बजवावावे लागत असल्याने त्यांना या सणापासून वंचित राहावे लागत असल्याचे लक्षात घेत दिवा शहरातील महिला भगिनींनी दिवा पोलीस चौकीत रक्षाबंधन साजरे केले पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली.अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून आज त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, देव त्यांच रक्षण करो, अशी प्रार्थना या पोलीस बांधवांसाठी महिलांनी देवाकडे केल्याचं यावेळी पहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय राष्ट्रिय हिंदू परिषदेच्या अंतर्गत कोकण प्रांत च्या महिला अध्यक्ष वर्षा म्हात्रे, वैदेही पालकर राधिका सावंत आदी महिलांनी सहभाग घेत यावेळी पोलीस कर्मचारी यांना राखी बांधली.
प्रसंगी दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर तसेच रवींद्र देसले, अनिल कुरघोडे, लीलाधर सोळुंखे आदी पोलीस कर्मचारी यांना राखी बाधून पोलिस उपस्थित होते