*दिवा भाजपच्या नेतृत्वात वॉटर..मीटर..गटर..आंदोलन….*
*शिवसेना हाय हाय…पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…आई ने भरली मावशीची ओटी गेले कुठे दिव्याचे आठशे कोटी…..*- *दिवा भाजप*
दिवा शहरात दिवसे दिवस विविध समस्यां डोकं वर काढत आहे नागरिकांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना पक्ष व ठाणे महापालिका प्रशासनाने भाजप कडून विविध आंदोलने ,मोर्चे काढून लक्ष वेधल्या नंतरही सत्ताधारी पक्ष नागरिकांच्या समस्ये कडे दुर्लक्ष करून नागरिकांना पाण्यावाचून वंचित ठेवत आहेत त्या विरोधात आज भाजप च्यावतींने दिव्यात भव्य असा वॉटर, मीटर, गटर मोर्चा काढून पुन्हा ठाणे महापालिका व स्थानिक नगरसेवकांचे लक्ष वेधन्यात आले यावेळी महिलांनी रिकामी मडके घेऊन स्थानिक नगरसेवक व महापालिकेचा त्रिव शब्दात निषेध करत शिवसेना हाय हाय,पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,आई ने भरली मावशीची ओटी गेले कुठे दिव्याचे आठशे कोटी अशा घोषणा देऊन आपली नाराजी व्यक्ती केली तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)दिव्यातील आंदोलनात सक्रिय सहभाग घेत दिव्यातील रिपब्लिकन नेते एकनाथजी भगत देखील आपल्या समर्थकांसह आंदोलनात सामील झाले होते.दिवा शहराला 32+आणि आता मिळालेले 5 असे एकूण 37 एम एल डी पाणी मिळाले असून सुद्धा ते दिवा पाण्यापासून वंचित आहे यासाठी लवकरच ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहोत असे मुंडे यांनी स्पष्ट केल
आंदोलनात आमदार संजयजी केळकर,आमदार निरंजन डावखरे,जैष्ठ नगरसेवक सजयजी वाघुले,भाजप चे कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे आदी सह भाजप चे अनेक स्थानिक प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.