कोकणची लोककला बहुरंगी नमनाचा शुभारंभ प्रयोगाला कोकणी युट्युबर व इस्टा स्टार बिन्धास्त मुलगी (गौरी) आणि सायली इंदुलकर यांची प्रमुख उपस्थिती…
अमित जाधव - संपादक
मुंबई (नरेश मोरे): रसिक राजा प्रथमच मुंबई रंगमंचावर आम्ही कोकणकर प्रस्तुत ..”कोकणचे बहुरंगी नमन” सोहळा पुर्वज्यांच्या पुण्याईचा आपल्या कोकण संस्कृतीचा ..! नुकताच या सोहळ्याचा मुंबई येथे नटेश्वराला पुष्प अर्पून गणरायाला वंदन करून या सोहळ्याचा शुभारंभाचा श्रीफळ फोडून श्री गणेशा केला .या कार्यक्रमाला कोकणी युट्युबर व इस्टा स्टार बिन्धास्त मुलगी गौरी आणि सायली इंदुलकर हे उपस्थित होते . त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोकणातील तरुण पिढी एकत्र येऊन या भरगच्च सोहळ्याचे मुंबई रंगमंचावर आयोजन करत आहेत तरी या सोहळ्यात कोकणातील नामांकित व्यक्तीमहत्व या सोहळ्याचे अनेक कोकणी हिऱ्यानी सहभाग घेतला आहे कारण हे फक्त “नमन” नसून एक कला आहे आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचा आपल्या कोकण संस्कृतीचा ; अनेक नावाजलेले गायक गायिका नामवंत शाहीर , गीतकार , संगीतकार , अभिनेत्री , *सोशल मीडिया स्टार ,रील्स स्टार ,अनेक नामवंत कलाकार* पाहायला मिळतील , या सोहळचे संगीत *अमोल भातडे* यांच्या मार्गदर्शना खाली झाले असून गीतकार *मिलिंद ठीक ,अमोल भातडे, अजय घाणेकर ,* यांच्या लेखणीनें गाणी स्वरबंद झाली आहेत , कोकणातील सुप्रसिद्द असा आवाज *गायिका संगिता पांचाळ मॅडम*,शक्ती तुरा स्टार *तेजल पवार मॅडम* ,*गायिका पूनम कोंडगेकर मॅडम*, कोकणातील सुप्रसिद्द असा गोड आवाज *शाहीर प्रकाश पांजणे ,* सद्या सोशल मीडियावर सगळी कडे चर्चा आहे असे कोकणी बुलुंद आवाज *तरुण शाहीर विकास लांबोरे* ,कोकणी हिपॉप स्टार *आदित्य पवार* ,कोकणी तरुण नव्योदीत गायक *ह्रितिक घाडीगोंकर*, असे कोकणी एकास एक नावाजलेले चेहरे कोकणच्या नमन क्षेत्रात प्रथमच एकाच रंगभूमीवर या सोहळ्याला आपल्याला मग्नमुग्ध संगीतात तृप्त करायला येत आहेत जोडीला कोकणातील नामवंत कलाकार आहेतच सोबत कोकणचा आपल्या सर्वात जवळचा चेहरा मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी सोशल मीडिया स्टार ,रील्स स्टार ,कोकण कन्या *बिन्दास्त मुलगी (गौरी )* जोडीला मुंबईची लाईफ लाईन असलेली मुंबई लोकल सतत आपल्या प्रवासात घडत असणारे अनेक किस्से समोर घेऊन येत असते आम्हाला हसवत असते अशी रील्स स्टार कोकण कन्या *सायली इंदुलकर*. सोबत आपल्या सर्वांचा लाडका कॉमेडी किंग कोकण सुपुत्र , चला हवा येऊ द्या फेम *अनंत ठीक* सोबत लालबाग परेळ क्रिएटर *प्रथमेश पवार* , सोबत रंगभूमीवर नावाजलेला चेहरा *अभिनेत्री तक्षयी गाडगे कोकण कन्या मनाली करण,अमोल भातडे ,रमेश शिगांवकर , आनंद सनगरे, विनेश माटल , बंदिश अव्हेरे ,प्रीती भोसले ,सुनैना कोंडविलकर , वैभव येद्रे , वेदिका मांडवकर , प्रतीक गुडेकर ,*आदित्य येद्रे ,किरण जोयशी ,नेहा जोशीलकर, नेहा शिरगावकर, अमित गोणबरे सागर मालुसरे,सोबत आम्ही कोकण कर यांचे नामवंत असे कलाकार,* नृत्याचा अविष्कार जबरदस्त असा नृत्याचा नजराणा कोरियोग्राफर *कैलास सोलकर..* आणि या सर्वाना एका मंचावर घेऊन येत आहेत कोकणी भूमिपुत्र ,ज्याचे कोकणच्या या लोककलेवर जीवापाड प्रेम आहे ,कोकणच्या बहुरंगी नमनाला एक वेगळ्या उंचावर घेऊन जाण्याचे स्वप्न आहे ,एक वेगळा दर्जा निर्माण करण्याचा मानस मणी बाळगणारे *लेखक दिग्दर्शक -कृष्णा शांताराम येद्रे* सोबत ही सुंदर अशी संकल्पना समोर घेऊन येणारी *निलम कृष्णा येद्रे* असून सर्व तरुण युवक युवती यांचा हा अविस्मरणीय सोहळा लवकरच मुंबई रंगमंचावर येणास सज्ज होत आहे रसिक राजा नक्की या तरुण पिढी च्या या सोहळ्याला आपला आशीर्वाद द्यायला थेटर मध्ये या ..या कोकणच्या सोहळ्याचे नक्की आपण सर्व साक्ष बनवूया, आपण सर्व नमन प्रेमिनी आवश्यक हजर रहावे. तरी अनेकांच्या आशिर्वादाने शुभारंभ प्रयोग जल्लोषात साजरा झाला .