महाराष्ट्रातील सर्व एस टी बस स्थानके व रेल्वे स्थानकावर श्रीरामाचा जयघोष करावा..
अमित जाधव - संपादक
ठाणे ता २० जाने : येत्या २२ तारखेला प्रत्येक राज्यातील सर्व एस टी बस स्थानके व सर्व रेल्वे स्थानकावर श्रीरामाचा जयघोष करण्यासाठी अनाउन्समेंट करावी अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांसकडे भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी मागणी केली आहे. ५०० वर्षापूर्वी एक दुःखद इतिहास या भारतवर्षात प्रत्येक भारतीयाला , हिंदुत्वाला सहन करावा लागला होता. आमच्या श्रीरामाच्या मंदिराचा अक्षम्य अपमान झाला होता. त्यानंतर आज जवळजवळ शेकडो वर्षांनी २२ जानेवारीला अखंड भारतवर्ष एका सुवर्णमय, सुखद इतिहास लीहणार आहे. आमचे प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या हक्काच्या राममंदिरात विराजमान होत आहेत आणि हा एक न भूतो न भविष्यती असा सोहळा असेल. देश स्वतंत्र झाला तरी ७० वर्षांच्या उदासीनतेमुळे श्रीराम प्रभूंना त्यांच्या तंबुतून स्वातंत्र्य मिळत नव्हते. पण जेव्हा २०१४ ला पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले , म्हणजेच प्रत्येक हिंदू बांधवाचे सरकार आले आणि राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. त्याचीच परिणीती म्हणून २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर स्थापना सोहळा होत आहे.
आपण तो एक मोठा उत्सव म्हणून साजरा करत आहोत. जिकडे तिकडे श्रीराम श्रीराम हेच दृश्य , श्रीराम हाच ध्वनी, हाच महामंत्र निदान त्या दिवशी कानी पडू देत. त्याचाच एक भाग म्हणून मी आपणास एक नम्र विनंतीवजा मागणी करत आहे की २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रसहित प्रत्येक रेल्वे स्थानकावर नियमित रेल्वेच्या उद्घोषणांसोबत अथवा मधील कालावधीत सतत श्रीराम प्रभूंचा मंत्रघोष, (जय राम श्री राम जय जय राम) रामधून सतत चालू ठेवावी आणि संपूर्ण परिसर राममय करावा.
याच प्रकारे ही संकल्पना आपण सर्व एस. टी.बस स्थानके, बाजारपेठा इत्यादी सार्वजनिक स्थळी राबवावी अशी मागणी केली आहे.