ब्रेकिंग
आता ठाकरे गटात प्रवेश केलेल्या दिवा भाजप च्या मंडळ अध्यक्ष ला काय म्हणायचे.. गद्दार की खुद्दार..निलेश पाटील.शिवसेना (विभाग प्रमुख)
अमित जाधव - संपादक
- दिवा ठाणे /भाजप चे माजी मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला यावर प्रतिक्रिया देताना दिवा शिवसेनेचे निलेश पाटील यांनी स्पष्ट केलं की जेव्हा आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करतो तेव्हा आम्हाला गद्दार म्हणून हेच अध्यक्ष महाशय सभोधत होते आता तुम्हाला “गद्दार की खुद्दार” काय म्हणायचे आम्ही व निलेश पाटील यांनी ४ महिन्यांआधीच भविष्यवाणी केली होती येणाऱ्या काळात रोहीदास मुंडे ठाकरे गटात दिसतील व आज त्यांच भाकीत खर ठरवताना दिसतय आता दिव्यातील जनता नक्कीच सावध झाली असून कोण स्वार्थासाठी आणि जनतेसाठी पक्ष प्रवेश करतो हे समजले आहे.
जनाची नाही मनाची तरी ठेवा ज्या पक्षात सामील झालात त्याच पक्षात मोठी नाराजी आहे हे चित्र दिव्यात पहिल्यांदा दिसत आहे कार्यकर्ते व पदाधिकारी भयभीत झाले असून आता पक्षाची प्रतिमा इकडे कशी राहील हे सांगता येत नाही हा प्रश्न ठाकरे गटाला पडत आहे